छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपले नाव डावलून उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी ऐनवेळी प्रदीप शिंदे यांचे नाव निश्चित केले, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे विनोद बनकर यांनी क्रांतीचौकात उपमहापौरांविरोधात आंदोलन करीत प्रतिमेला जोडे मारले. तसेच काही कार्यकत्यांनी प्रतिमा फाडत हाय हायच्या घोषणा दिल्या. त्यामुळे पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तर अनेक जुन्या माजी नगरसेवकांना डावलण्यात आल्याने भाजपमध्येही नाराजीचे चित्र दिसून आले.
शासनाच्या नव्या नियमामुळे यंदा मनपात दहा स्वीकृत नगरसेवक निवडून देण्यात आले आहेत. महापौर समीर राजूरकर यांनी तौलनिक संख्याबळ असलेल्या राजकीय पक्ष व नोंदणीकृत गटांच्या नेत्यांकडून प्राप्त झालेल्या पत्रातील नावांवर सोमवारी शिक्कामोर्तब केला. यात भाजपच्या वाट्याला ५,
पालकमंत्र्यांच्या समर्थनार्थ घोषणा
बनकर हे पालकमंत्री शिरसाट यांचे कार्यकर्ते असल्यामुळेच उपमहापौर जंजाळ यांनी डावलले, असा आरोप करीत बनकर यांनी क्रांतीचौकात आंदोलन केले. उपमहापौरांविरोधात जोरदार घोषणा देत पालकमंत्री संजय शिरसाट तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, असे म्हणत त्यांनी उपमहापौरांच्या प्रतिमेला जोडे मारून फाडले. या आंदोलनामुळे सेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकीवेळी देखील असेच आंदोलन सेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी केले होते.
एमआयएमला ३ आणि शिंदेसेना, उद्धवसेना यांना प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य देता आले. मात्र, शिंदे सेनेत या नावावरून पुन्हा एकदा पालकमंत्री संजय शिरसाट उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद चव्हाट्यावर
आला आहे. स्वीकृतसाठी शिंदेसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या इच्छुकांपैकी एक असलेले विनोद बनकर यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवक करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याच्याऐवजी शिंदे यांची निवड करण्यात आली.
















